नकाणे रोडवरील लूट प्रकरणातील तिसरा संशयित पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST2021-06-01T04:27:14+5:302021-06-01T04:27:14+5:30

देवपुरातील नकाणे रोडला लागून विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या व्यवहारातील सुमारे ६ लाख ३७ हजार रुपयांची रोकड घेऊन कर्मचारी ...

A third suspect in the Nakane Road robbery case was nabbed by the police | नकाणे रोडवरील लूट प्रकरणातील तिसरा संशयित पोलिसांनी पकडला

नकाणे रोडवरील लूट प्रकरणातील तिसरा संशयित पोलिसांनी पकडला

देवपुरातील नकाणे रोडला लागून विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या व्यवहारातील सुमारे ६ लाख ३७ हजार रुपयांची रोकड घेऊन कर्मचारी गोकुळ वाणी कॅनरा बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. नकाणे रोडवर त्यांना शुक्रवारी दुपारी पाचजणांच्या टोळीने अडविले. शिवीगाळ करीत त्यांना मारहाण देखील केली. ६ लाख ३७ हजारांची रोकड, तीन धनादेश व अन्य काही वस्तू डिक्कीतून काढत टोळके पसार झाले होते़ घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस पथकासह दाखल झाले. त्यांनी टोळीबद्दल माहिती जाणून घेत टोळक्याचा सुगावा लावला़ आकाश पानपाटील आणि विक्की शेजवळ या दोघांना त्यांनी शिताफीने अटक केली. अन्य तिघांचा शोध सुरू असताना साक्री रोडवरील भीमनगरातील रहिवासी सनी ऊर्फ सागर मोहिते असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली़ त्याची खातरजमा करीत सागर मोहितेच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ उर्वरित दोघा संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़

Web Title: A third suspect in the Nakane Road robbery case was nabbed by the police