भरदिवसा मांडला चोरट्यांनी उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:52 PM2019-11-07T21:52:42+5:302019-11-07T21:53:01+5:30

मोराण्यासह धुळ्यात घरफोडी : बंद घराचा फायदा घेत चोरीचे सत्र, भीतीचे वातावरण

The thieves woke up on a happy birthday | भरदिवसा मांडला चोरट्यांनी उच्छाद

भरदिवसा मांडला चोरट्यांनी उच्छाद

Next

धुळे : तालुक्यातील मोराणे प्ऱ लळींगसह धुळ्यात भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्यामुळे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला़ चोरट्यांनी उच्छाद मांडलामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 
मोराणे प्ऱ लळींग येथील गुरु गणेश नगरात राहणारे रणजित चिंधा साळुंखे यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधली़ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत १२ हजाराची रोकड असा ऐवज चोरुन नेला आहे़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली़ पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक आऱ एम़ काळे, उपनिरीक्षक गजानन गोटे तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ चोरट्यांचा माग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ 
मोराणे येथील कमलेश राजपूत यांच्याही घरी चोरट्यांनी डल्ला मारला़ त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ९० हजार रुपये किंमतीचे ४५ ग्रॅम सोने, २४ हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३४ हजार रुपये किंमतीचे १७ ग्रॅम वजनाचे दागिने, ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, २५ भार चांदी, ४६ हजार रुपयांची रोकड असे मिळून लाखों रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आहे़ चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस       निरीक्षक काळे घटनेचा तपास करीत आहेत़ 
मालेगाव रोडवरील दोन घटना
मालेगाव रोडवरील महावीर हौसिंग सोसायटीत राहणारे आशिष वसंत लिंगाडे (३९) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बुधवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ४० हजारांची घरफोडी चोरट्यांनी केली आहे़ चोरट्याने घरात घुसून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा लंपास केल्या़ 
मालेगाव रोडवरील वल्लभ नगरात राहणारे महेश सुरेश काबरा (५२) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, दुपारी साडेबारा ते दुपारी २ वाजेदरम्यान, चोरट्यांनी हातसफाई केली आहे़ १०० आणि ५०० रुपये दराच्या नोटा असे एकूण २० हजार रुपये लांबविले़ ते घरी आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ 
हिंमत वाढली 
घरफोडी ही शक्यतोअर पहाटे किंवा मध्यरात्रीच्या सुमारास होत असतात़ पण, आता चोरट्यांनी मजल मारत दिवसा घरफोडी करुन चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले असल्याचे घडणाºया घटनांवरुन समोर येत आहे़ दिवसा भ्रंमती करायची, बंद घर दिसले की हातसफाई करायची असे धोरण बहुधा चोरट्यांनी आखले असावे, असा अंदाज आहे़ 

Web Title: The thieves woke up on a happy birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.