चोरट्यांचा मंदिरातील दानपेटीवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 22:40 IST2019-09-15T22:40:32+5:302019-09-15T22:40:50+5:30

होळनांथे : ८ दिवसात दुसऱ्यांदा चोरीची घटना

The thieves stumble upon a treasure chest in the temple | चोरट्यांचा मंदिरातील दानपेटीवर डल्ला

dhule

होळनांथे : येथील अजंदे बु. हद्दीतील बभळाज रस्त्यालगत असलेल्या साई मंदिरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे २ ते ३ हजाराची रक्कम घेऊन पोबारा केला. दरम्यान, ८ दिवसापूर्वी याच मंदिरातून सुमारे ७ हजार रुपये किंमतीची घंटा चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली होती.
चोरट्यांनी साई मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. मंदिरातील कपाट फोडून त्यातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मात्र, त्यांची निराशा झाली. त्यानंतर चोरट्यांनी मंदिरात दानपेटी मागील बाजूस नेऊन त्यातून सुमारे २ ते ३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने होळनांथे परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. गावात होमगार्ड व पोलीस कर्मचाºयाची नियुक्ती करुनही चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साई मंदिरातील चोरीच्या घटनेची तक्रार साई देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र रणजितसिंह राजपूत यांनी दिली असून थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The thieves stumble upon a treasure chest in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे