चोरट्यांनी दोन दुचाकी जाळल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:09 IST2019-07-29T23:08:54+5:302019-07-29T23:09:11+5:30

दोंडाईचातील घटना : चोºयांचे सत्र सुरू; नागरिकांत रोष 

The thieves burnt two wheels | चोरट्यांनी दोन दुचाकी जाळल्या 

चोरट्यांनी चोरी करून नंतर जाळलेल्या दोन दुचाकीची अशी अवस्था झाली.

दोंडाईचा :  शहरातील राऊळ नगरात चोरी, स्टेशनरोडवर वृद्धेचा हातातील बांगड्या चोरून नेल्याच्या घटना ताज्या असतानाच येथील डी.जी. नगर व गणेश नगरातून रविवारी पहाटे दोन दुचाकी, ट्रॅक्टरची बॅटरी व मोबाईल लांबविण्यात आली. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी दोन्ही चोरलेल्या दुचाकी खोडसाळपणे जाळून टाकल्याचे स्पष्ट झाल्याने संताप व्यक्त होत आहे. 
दुचाकी का जाळल्या याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून त्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री डी.जी. नगर  भागातून  नितिन गुलाबराव बागल यांची सुमारे २५हजार रुपये किमतीची व एमएच १८ यु ६४१७ क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. तसेच गणेश नगर येथून मन्साराम चव्हाण यांच्या घरातील खिडकीतून  ३२ हजार ९९९ रु किमतीचा मोबाईल व त्यांच्या घराजवळ लावलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची व एमएच १८ एबी ९२७८ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. याच परिसरात  वास्तव्यास असलेल्या राजपाल भद्रसिंग गिरासे यांच्या ट्रॅक्टरची  सुमारे  आठ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली. हा सर्व प्रकार रविवारी सकाळी  लक्षात आला.  दोन्ही दुचाकींचा सकाळपासून तपास सुरू होता. त्या रामी रोडला वेअरहाउसच्या पुढे असलेल्या नाल्यात जळालेल्या अवस्थेत आढळल्या. 
सलग चोºयांमुळे रोष व्यक्त  येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी  व त्यांचा  पथकाने घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. दुचाकी जाळण्याचे कारण गुलदस्त्यात असून  या प्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या सलग चोरीचा घटनांमुळे पोलिसांना आपली तपासाची दिशा बदलावी तसेच गतीही वाढवावी, असा संतप्त सूर नागरिकांचा आहे.
 

Web Title: The thieves burnt two wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे