चोरट्यांनी साड्यांचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:08 IST2020-08-10T22:08:12+5:302020-08-10T22:08:35+5:30
धुळे : रोख रकमेसह ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास, शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा

चोरट्यांनी साड्यांचे दुकान फोडले
धुळे :जमनागिरी दत्त मंदिरापासून सुरु होणाऱ्या शंभर फुटी रोडवरील बाळाप्पा कॉलनीलगत असलेल्या कन्हैय्या कलेक्शन या दुकानात सोमवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली़ यात७ हजार रूपये रोख, साड्या, ड्रेस मटेरियलसह एकूण ६८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
बाळाप्पा कॉलनीत राहणाºया भाग्यश्री राजेंद्र चौधरी यांचे कन्हैय्या कलेक्शन नावाचे दुकान आहे़ पहाटे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ वर्दळीचा रस्ता असूनही चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून दुकानातील रोकडसह किंमती साड्या व ड्रेस मटेरियल लांबविले आहे़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथकाने बाळाआप्पा कॉलनीसह नारायण मास्तर चाळीतून चितोड रोडमार्गे चोरट्यांचा माग काढला़ मात्र पुढे जावून श्वान पथक अपयशी ठरले़ या दुकानातून रोखरक्कमसह साड्यांसह ६८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.घटनेची माहिती मिळता पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह मुक्तार मन्सुरी, पंकज खैरमोडे, के़ ए़ सैय्यद, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींनी पहाणी केली. याप्रकरणी संजय किशन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायमास्ट बंद असल्याने चोरांचे फावले
सर्वात मोठा असलेला शंभर फुटी रस्ता असल्याने पाच दिवे असलेला हायमास्ट बसविण्यात आलेला आहे़ या हायमास्टमुळे चौक आणि परिसर रात्रीच्या वेळेस उजळून निघायचा़ मात्र, गेल्या वर्षभरापासून हा हायमास्ट बंद असल्याने आणि स्थानिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करुनही हायमास्ट अद्यापही दुरुस्त झालेला नाही़ परिणामी बंद असलेल्या हायमास्टचा चोरट्यांनी फायदा उचलला आणि हातसफाई केल्याची चर्चा परिसरात चर्चा सुरु आहे़