घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांची तीन घरात हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:24+5:302021-07-31T04:36:24+5:30

वसंत बच्छाव यांच्या घरातून चोरट्याने २० ते २५ हजार रुपयांची रोकडसह दागिने लांबविले. एकनाथ माळी यांच्या घरातून चोरट्यांनी १ ...

Thieves break into three houses, taking advantage of not being at home | घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांची तीन घरात हातसफाई

घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांची तीन घरात हातसफाई

वसंत बच्छाव यांच्या घरातून चोरट्याने २० ते २५ हजार रुपयांची रोकडसह दागिने लांबविले. एकनाथ माळी यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांसह १८ ते २० ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले. माळी यांचा मुलगा गावातील घरात रात्री झोपायला येत होता. मात्र ८ दिवसांपासून तो ही शेतातच झोपत असल्याने गावातील घरात कोणीच नव्हते. ही संधी साधून चोरट्याने हातसफाई केली. जगदीश चौधरी यांच्या घरात मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्रीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिसांसह श्वान पथक दहिवेल गावात दाखल झाले. दुपारी १ वाजेपर्यंत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Web Title: Thieves break into three houses, taking advantage of not being at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.