चोरीच्या सहा मोबाइलसह चोरटा सोनगीर पोलिसांच्या जाळ्यात

By देवेंद्र पाठक | Updated: September 16, 2023 16:49 IST2023-09-16T16:49:09+5:302023-09-16T16:49:28+5:30

सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी एक पथक तयार करून मोबाइल चोरणाऱ्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली.

Thief Songir with six stolen mobiles in police net | चोरीच्या सहा मोबाइलसह चोरटा सोनगीर पोलिसांच्या जाळ्यात

चोरीच्या सहा मोबाइलसह चोरटा सोनगीर पोलिसांच्या जाळ्यात

सोनगीर : विविध कंपन्यांचे सहा मोबाइल चोरणाऱ्या राजस्थान राज्यातील कामगार असलेल्या एक संशयिताला सोनगीर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील सहा मोबाइल असा ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशालसिंग राजेंद्रसिंग राठोड (वय २७, रा. पुराणी चुगी, आग्रा रोड, जयपूर) असे चोरट्याचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. सोनगीर येथील दादासाहेब महाजन पार्क या ठिकाणी गेल्या महिन्यात अज्ञात चोरट्याने मोबाइल चोरल्याप्रकरणी सोनगीर पोलिसांत श्यामल जगदेव माथो याने फिर्याद दिली होती.

यावरून सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी एक पथक तयार करून मोबाइल चोरणाऱ्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. तपासात कामगार असलेल्या आपल्या सहकाऱ्यांचेच विविध कंपन्यांचे मोबाइल चोरल्याप्रकरणी संशयित आरोपी विशालसिंग राठोड याला सोनगीर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे एकूण सहा मोबाइल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, पोलिस हेडकॉन्स्टेबल कुदरत अली सय्यद, संजय देवरे, राहुल सानप, सूरज कुमार साळवे, विजयसिंग पाटील, राकेश ठाकूर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कुदरत अली सय्यद करीत आहेत.

Web Title: Thief Songir with six stolen mobiles in police net

टॅग्स :Dhuleधुळे