लोकसभा मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 20:31 IST2019-04-28T20:30:51+5:302019-04-28T20:31:41+5:30

मेहेरगाव येथे जा हीर सभा : आमदार कुणाल पाटीलयांचा आरोप

There is no development in the Lok Sabha constituency | लोकसभा मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही

dhule

धुळे : लोकसभेतील हा विधानसभा मतदारसंघात कोणताही विकास नाही, लोकांमध्ये भाजपाविषयी संतापाचे वातावरण असल्याचे काँग्रेस - राष्टÑवादीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी मेहेरगाव येथील प्रचारसभेत सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जि.प. सदस्य किरण पाटील, गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते महेश मिस्त्री, भगवान पाटील, लहू पाटील यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत मनोगत व्यक्त करताना माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच काम केले मात्र भाजपामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. राज्य घटनेत छेडछाड करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

Web Title: There is no development in the Lok Sabha constituency

टॅग्स :Dhuleधुळे