धुळ्यात ‘कोरोना’बाधीत रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:55 IST2020-03-12T22:55:21+5:302020-03-12T22:55:42+5:30
जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी एकाचे रक्ताचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

धुळ्यात ‘कोरोना’बाधीत रुग्ण नाही
धुळे : विदेशातून आलेल्या एकाची प्रकृति थोडी बिघडली़ ‘कोरोना’ची लागण लागल्याच्या संशयावरुन एक जण रुग्णालयात दाखल झाला होता़ परंतु त्या रुग्णाला कोरोनाची कोणत्याही प्रकारची लागण लागलेली नाही़ मात्र, सुरक्षितता म्हणून त्या रुग्णाच्या रक्ताचे नमूने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत़ अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी दिली़
‘कोरोना’ची भीती सर्वत्र निर्माण झाली असलीतरी त्याला कोणीही घाबरु नये, स्वच्छता आणि गर्दीपासून लांब राहण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़
४०० माध्यमिक शाळांना पत्र
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, महाराष्टÑात काही संशयित रूग्ण आढळल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुमारे ४०० माध्यमिक शाळा, व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सूचना देत जनजागृती सुरु केली आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी काळजी घेण्याच्या सुचना शाळांना पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
विद्यार्थी आजारी असल्यास त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी असे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल तर त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी. सर्दी खोकला झालेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांमध्ये न मिसळणे, नाक, डोळे, तोंड यांना वारंवार हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून लांब राहावे, जवळच्या दवाखान्यात भेट देऊन तपासणी करावी, आपले हात वारंवार सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवून स्वच्छ करावेत. तसेच अन्य बहुसंख्य संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत येतांना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, नेर येथील माध्यमिक शाळेतही प्रार्थनेच्यावेळी कोरोना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील सुमारे ४०० माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोरोनाविषयी जनजागृती व घ्यावयाची काळजी या संदर्भातील पत्रके पाठविण्यात आलेली आहेत. -डॉ.सुभाष बोरसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, धुळे
धनगर आरक्षण संवाद मेळावा रद्द
नेर : धुळे तालुक्यातील उडाणे येथे रविवार १५ मार्च रोजी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई शाखा धुळेने आयोजित केलेला ‘धनगर आरक्षण संवाद मेळावा’ कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधित उपायांमुळे कोणतेही मान्यवर येऊ शकत नसल्यामुळे रद्द करण्यात आला आहे़ असे सुभाष मासुळे यांच्याकडुन कळविण्यात आले़
आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप मागे : संघटना
धुळे : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे संप मागे घेतला आहे़
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे़ तसेच धुळे शहरातही काही संशयित रुग्णांच्या घशातील आणि नाकातील स्त्रावाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाºयांच्या आदेशानुसार संप मागे घेण्यात आला, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष विलास वारुडे यांनी दिली़
कर्मचारी महासंघाच्या नियोजित वेळापत्रकानुसार ११ मार्चला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार होता़ त्यानंतर १६ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार होते़ गुरूवापासून बेमुदत काम बंद आणि बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार होते़ सर्व कर्मचारी सकाळी अकरा वाजता क्युमाईन क्लब जवळ आंदोलनासाठी जमले होते़ परंतु संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाºयांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य कर्मचारी नियमीतपणे आरोग्य सेवा सुरू ठेवतील, असे वारुडे यांनी यावेळी सांगितले़