धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:45 IST2020-04-06T21:45:38+5:302020-04-06T21:45:58+5:30
मात्र खबरदारी घेण्याच्या सूचना, नागरीकांनी घरातच थांबावे - पालकमंत्री

धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण नाही
धुळे : सुदैवाने धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेल नाही़ मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले़
जगभरात तसेच देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. असे असताना धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले नाही. याचे श्रेय धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल व इतर प्रशासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जाते. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आजपर्यंत धुळे जिल्हा कोरोनापासून सुरक्षित आहे. असे असले तरी कोरोना सोबतची आमची लढाई अद्याप संपली नाही, म्हणून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे़
जिल्ह्यात स्क्रीनींगद्वारे ७३ जणांची रुग्ण तपासणी करण्यात आली. यातील ७२ जणांवर उपचार करण्यात आले. त्यातील एक जण दवाखान्यात उपचार घेत असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.