Theft in two shops by CCTV closure | सीसीटीव्ही बंंद करून केली दोन दुकानात चोरी
dhule

धुळे : लोखंडी टॅमीचा वापर करीत सीसीटीव्ही कॅमेराची चीफ बाजूला सरकवित चोरट्यांनी दोन दुकानात आपली हातसफाई केली़ ही घटना मंगळवारी पहाटे शहरातील भाईजी नगरात घडली़ चोरट्यांनी आपला मोर्चा आता दुकानांकडे वळविला असल्याचे यातून समोर येत आहे़
शहरातील मील परिसराच्या मागे असलेल्या भाईजी नगर भागातील पार्वती नगर प्लॉट नंबर २५ येथे मोहित संजय मोहिते यांचे श्री मेडीकल दुकान आणि त्याच्याच बाजुला आईस्क्रिमसह विविध वस्तू विक्रीचे संजय साखला यांचे दुकान आहे़ पहाटेच्या सुमारास चोरट्याने लोखंडी टॅमीचा आधार घेऊन दोन्ही दुकाने फोडले़ चोरट्याने सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरा शोधून त्याची चीप काढून घेतली़ परिणामी सुरुवातीचे काही क्षण कॅमेरात टिपले गेले आहे़ उर्वरीत काहीही कॅमेरात येऊ शकलेले नाही़ गल्ल्यातील रोख ४ हजारासह २ हजार २०० रुपयांचे मशीन आणि दुसऱ्या दुकानातील प्लबिंगच्या वस्तुंसह अन्य साहित्य चोरट्याने चोरुन नेले आहे़
सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे समोर आले़ या घटनेची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे़ पुढील तपास सुरु आहे़


Web Title: Theft in two shops by CCTV closure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.