धुळयात शिवशक्ती काॅलनीत चोरी, आपला मुलगाच चोर वडिलांची पोलिसात फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:35+5:302021-09-14T04:42:35+5:30
याप्रकरणी वेडू खंडू सोनवणे (रा.शिवशक्ती कॉलनी, मिल परिसर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ११ सप्टेंंबर रोजी रात्री साडे ...

धुळयात शिवशक्ती काॅलनीत चोरी, आपला मुलगाच चोर वडिलांची पोलिसात फिर्याद
याप्रकरणी वेडू खंडू सोनवणे (रा.शिवशक्ती कॉलनी, मिल परिसर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ११ सप्टेंंबर रोजी रात्री साडे आठ ते ११ वाजेच्या सुमारास घरातील कपाटातून स्वत:च्या केमो थेरपी उपचारासाठी ठेवलेले ५० हजार रुपये रोख, मोठा मुलग देवेंद्र याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे डिलरशिपचे कागदपत्र, आणि तीन नंबरचा मुलगा केतन याचे इंडियन ऑईल कंपनीचे डिलरशीपचे कागदपत्रे आणि त्या दोघांचे शालेय शिक्षणाचे मुळ कागदपत्र त्यांचाच दोन नंबरचा मुलगा गौरव वेडू साेनवणे उर्फ मोन्या याने घराच्या कपाटातील लॉकर तोडून त्यातून चोरुन नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर वडील वेडू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्या दोन नंबरचा मुलगा गौरव विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.