हातगाडीला कट लागल्याने बसचालकाला शिवीगाळ; धुळ्यातील घटना, एकजण ताब्यात
By अतुल जोशी | Updated: October 11, 2023 17:13 IST2023-10-11T17:13:12+5:302023-10-11T17:13:28+5:30
याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, अल्पवयीन मुलाला समज देऊन सोडून देण्यात आले.

हातगाडीला कट लागल्याने बसचालकाला शिवीगाळ; धुळ्यातील घटना, एकजण ताब्यात
धुळे : रस्त्यावर असलेल्या हातगाडीला कट लागल्याच्या कारणावरून नंदुरबार आगाराच्या बसचालकाला शिवीगाळ करून दमदाटी करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळ्यातील नेहरू चौक येथे घडली. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, अल्पवयीन मुलाला समज देऊन सोडून देण्यात आले.
नंदुरबार आगाराची बस नगावबारीकडून सावरकर पुतळामार्गे बसस्थानकाकडे जात होती. यावेळी जुना मुंबई- आग्रा महामार्गावरील नेहरू चौकात रस्त्यावर असलेल्या हातगाडीला बसचा कट लागल्याने संशयित आरोपींनी चालक गणेश रतन बेहरे (वय ३९, रा. नंदुरबार) यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी चालक गणेश बेहरे यांनी देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन असून, त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक एच.जे. पाटील करीत आहेत.