थाळनेर, सामोडेला पंचनाम्यांचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:04 IST2019-11-05T23:04:10+5:302019-11-05T23:04:55+5:30
सामोडेत ३०० एकरवरील सोयाबीन पीक जमीनदोस्त : शिरपूरात आमदारांनी घेतली बैढक

dhule
थाळनेर/पिंपळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात व पिंपळनेर येथील सामोडे परिसरात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फडबागायत, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
पिंपळनेर
सामोडे परीसरात २ रोजी महसूल विभाग व कृषी विभाग यांचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. परतीचा पाऊसामुळे सोयाबीन व मका बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील फडबागायत ३०० एकर जमीनीवर सोयाबीन पीक आहे. मात्र गेल्या १५ दिवसापासूनच्या पावसाने पिक जमिन दोस्त झाले. तोंडावर आलेल्या पिकांना कोंब फुटत आहेत. याबरोबरच चारा ही खराब झाला आहे. परिसरात पाहणीसाठी व पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी नहिरे, हेमंत बाविस्कर, महसूल विभागाचे सर्कल प्रमोद राजपूत, तलाठी दिलीप चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी बी.डी. जगताप, दिपक भारूडे, दिलीप घरटे, विलास घरटे, फडबागायत चेअरमन काशिनाथ घरटे आदींनी शेतकरी बंधुना बरोबर घेऊन पाहणी केली आणि पंचनामे केले.
शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने त्वरित भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे दिलीप घरटे, विलास घरटे व सामोडे भाजप कार्यकर्ते यांनी केली आहे. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या पुढे शेतकºयाला भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामोडे परीसरातील शेतकºयांनी केली आहे.
थाळनेर
थाळनेर - परिसरात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी,ज्वारी,मका,कापूस व अन्य सर्व पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून थाळनेर येथील तलाठी एस.के. मराठे यांच्यासह कोतवाल बाबाजी शिरसाठ, शेतकरी महेश सोनवणे, नंदकिशोर जमादार, वसंत वारूळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षी खरीप हंगामातील परतीच्या अवकाळी पावसाने मका, बाजरी, कापूस,ज्वारी यांच्यासह अन्य पिकांना चांगलेच झोडपून काढल्याने मळणीस आलेल्या मका, बाजरी व ज्वारी पिकांची चांगली दैना उडाल्याने या पिकांनी शेतातच अंकुर काढल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या दुष्काळ अवर्षण प्रणव स्थितीचा सामना करीत असलेला परिसरातील शेतकरी यंदाच्या अवकाळी पावसाने पुन्हा देशोधडीला लागला आहे.
थाळनेर, भोरटेक, मांजरोद, पिलोदा, सहपरिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकº्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची तात्काळ आढावा बैठक घेऊन तालुक्यात सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिलेत.