धुळे- जिल्ह्यातील आणखी १९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शिरपूर येथील दहा व दोंडाईचा येथील नऊ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. दोंडाईचा येथील डालडा मील परिसरातील चार महिला व दोन पुरूषांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. राणीपुरा येथील एक युवक व ढाभरी येथील दोन पुरूषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच शिरपूर येथील गोविंद नगर परिसरातील तीन पुरूष व एका महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. बौद्धवाडा, खालचे गाव येथील एक युवक एक पुरूष व एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अंबिका नगर येथील दोन मुली तर केजी रोड परिसरातील एका महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.
शिरपूरात दहा तर दोंडाईचा येथील नऊ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:58 IST