आणखी दहाजण कोरोना मुक्त; जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:30 IST2020-05-19T16:26:54+5:302020-05-19T16:30:04+5:30

भाडूंप येथील सहा तर धुळे जिल्ह्यातील चौघांचा समावेश

Ten more corona free; The district is moving towards coronation | आणखी दहाजण कोरोना मुक्त; जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

dhule

धुळे -जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाºया ४७ रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.त्यापैकी जिल्ह्यातील ४१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर भांडूप येथील सहा रूग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. सोमवारी धुळे शहरातील चार रूग्णांना रूग्णालयातून निरोप देण्यात आला.यात एसआरपीएफचे तीन जवान तसेच देवपूर परिसरातील २० वर्षीय तरूणाचा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये समावेश आहे.

Web Title: Ten more corona free; The district is moving towards coronation

टॅग्स :Dhuleधुळे