हजार रुपयांचा मोह दोघा डॉक्टरांना नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:34+5:302021-07-24T04:21:34+5:30
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्याने केलेल्या एनआरएचएम ...

हजार रुपयांचा मोह दोघा डॉक्टरांना नडला
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्याने केलेल्या एनआरएचएम अंतर्गतच्या कामांच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पंडित मोरे (३४, रा. वर्षी ता. शिंदखेडा) आणि नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज बारकू वाडेकर (रा. दत्त कॉलनी, साईमंदिराजवळ, देवपूर) यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीची शहानिशा करण्यात आली. एसीबीच्या पथकाने दुपारी सापळा लावून दोघा डॉक्टरांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.