सरवडनजिक टेम्पो उलटला, टमाटे महामार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 13:33 IST2019-09-08T13:32:29+5:302019-09-08T13:33:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क

सरवडनजिक टेम्पो उलटला, टमाटे महामार्गावर
धुळे : धुळ्याकडून इंदूरच्या दिशेने जाणारा टेम्पो टायर फुटल्यामुळे उलटला़ त्यात असलेले टमाटे महामार्गावर विखुरले गेले़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ दरम्यान, या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही़
एमएच १५ एफव्ही ११५२ क्रमांकाचा टेम्पो रविंद्र भामरे नामक चालक धुळ्याकडून इंदूरकडे टमाटे घेऊन जात होता़ मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरनजिक सरवड गावाजवळ रविवारी पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास टेम्पोचा टायर अचानक फुटल्याने भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटला़ यात टमाटे महामार्गावर विखुरले गेले़ टमाटेंचे नुकसान झाले असलेतरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे़ कोणालाही दुखापत झाली नाही़
घटना लक्षात येताच सोनगीर टोल नाक्याचे पेट्रोलिंग करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले़ त्यात सुमीत शिंदे, गोविंद सोनवणे, सरवडचे विकास गवळे, नरडाण्याचे अजय पाटील, प्रशांत गवळे, डॉ़ सचिन बारी आदींनी प्रयत्न करुन चालकाला धीर दिला़ तातडीने क्रेन आणून उलटलेला टेम्पो उभा केला़ यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़