दीपोत्सवाने उजळले एकविरा देवीचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:22 IST2020-12-01T22:21:43+5:302020-12-01T22:22:04+5:30
त्रिपुरारी पाैर्णिमा : २१०० दिव्यांचा लखलखाट

dhule
धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचे मंदिर साेमवारी दीपोत्सवाने उजळून निघाले होते. २१०० दिव्यांच्या प्रकाशाने मंदिरात एकच लखलखाट झाला होता.
त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिरात दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे यंदाचा दीपोत्सव अतिशय साध्या पद्धतीने झाला. सकाळी ८ वाजता आरती, पूजापाठ व अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात पालखी सोहळा झाला. तसेच शंख तीर्थ, अन्नदानासह विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. सायंकाळी ६ वाजता २१०० दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाचा कार्यक्रम वेदमंत्रोच्चाराच्या जयघोषात पार पडला. अनेक भाविकांनी पणत्या पेटवून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरामध्ये दिवसभर भाविकांची मांदियाळी होती. वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते.
दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी एकविरा देवी संस्थानचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव, मनोहर गुरव आदींनी परिश्रम घेतले.