दुस-या दिवशीही तापमान २़२ अंशांवर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:39 IST2018-12-30T22:38:37+5:302018-12-30T22:39:04+5:30

थंडीचा कडाका कायम : जनजीवन प्रभावित, गारठा आणखी वाढण्याचा अंदाज

Temperate temperature is 2 to 2 degrees on the second day | दुस-या दिवशीही तापमान २़२ अंशांवर स्थिर

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरासह जिल्ह्याभरात आलेली थंडीची लाट रविवारीही कायम होती़ किमान तापमानाने गाठलेला २़२ अंशांचा निचांक रविवारीही त्याच पाºयावर स्थिरावला़ दरम्यान, थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़  
यंदा २९ डिसेंबरला किमान तापमानाच्या पाºयाने २़२ अंशांपर्यंत घसरत २७ वर्षातील निचांक गाठला आहे़  त्यामुळे कडाक्याची थंडी पडत असून पहाटेच्या वेळी पडत असलेल्या धुक्यामुळे घराबाहेर पडणेही अशक्य होत आहे़ दिवसरात्र गार वारे वाहत असल्यामुळे नागरिकांना स्वेटर, टोपी, जर्कीन, मफलर, रूमालाच्या आधारे थंडीपासून बचाव करावा लागत आहे़  कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाल्यामुळे कधी तापमान पूर्वपदावर येईल, याची प्रतिक्षा धुळेकरांना लागून आहे़ 
राज्यभरात निचांकी तापमानात धुळयाची नोंद होत आहे़ रविवारी किमान तापमान सलग दुसºया दिवशी २़२ तर कमाल तापमान २६ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले़  थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने धुळेकरांना हुडहुडी भरली आहे़ 

Web Title: Temperate temperature is 2 to 2 degrees on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे