विवाह सोहळ्यांसाठी लागेल आता तहसीलदारांची परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:31 IST2021-03-15T18:29:47+5:302021-03-15T18:31:38+5:30

बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

Tehsildar's permission will now be required for marriage ceremonies | विवाह सोहळ्यांसाठी लागेल आता तहसीलदारांची परवानगी 

dhule

धुळे महानगरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रमासह लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. त्यात आता पुन्हा वधू व वर पित्याला विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच डीजे वाजविण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. दरम्यान यासाठी आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेसाठी व्यापक अभियान राबवावे, असेही निर्देश पालकमंत्री  सत्तार यांनी यावेळी दिले. 

Web Title: Tehsildar's permission will now be required for marriage ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे