सांगवी येथे हनुमान मंदिरात भरतेय लहान मुलांची शिकवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:45 IST2020-11-20T12:45:36+5:302020-11-20T12:45:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोराडी : कोरोना काळात काही गोष्टी अनोख्या बघायला मिळायला त्या म्हणजे कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा,कॉलेज बंद ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
बोराडी : कोरोना काळात काही गोष्टी अनोख्या बघायला मिळायला त्या म्हणजे कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा,कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डिजीटल माध्यमाद्वारे मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले होते.शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील लालकिराडपाडा येथे हनुमान मंदिरात आदिवासी कोकणी समाजातील तरुणांनी मुलांना पाढे आणि कविता शिकवण्यासाठी मोफत शिकवणी घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ग्रामीण भागात पालकांची आर्थिक परिस्तिती बेताची असल्यामुळे सर्वच मुलांना स्मार्टफोन घेणे शक्य नाही.त्यामुळे गणेश देशमुख,विकास गायकवाड, दिपक दळवी या आदिवासी कोकणी समाजातील तरुणांनी मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा मानस व्यक्त केला.सुरुवातीला तरुणांनी गावातील मुलांचा सर्व्हे करत किती जणांकडे स्मार्ट फोन आहे याचा आढावा घेतला पण या सर्वेक्षणात फक्त काही मुलांकडे स्मार्टफोन असल्याचे समजले.तर काही मुलांच्या पालकांकडे फक्त कॉलिंगची सुविधा असलेला तर काही मुलांच्या पालकांकडे फोनच नव्हता.त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये याकारणासाठी गावाबाहेरील लालकिराडपाडा येथे हनुमान मंदिरात मुलांना धडे शिकवायचे ही गणेश देशमुख यांना सुचली व मुलांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शाळेत असताना कधी एकदा सुट्टीचा दिवस येतोय असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचे पण या कोरोनामुळे मिळालेल्या सुट्या या मुलांसाठी कंटाळवाण्या ठरत आहेत.
अशातचं या उपक्रमाचा सध्याच्या घडीला त्यांना चांगलाच फायदा झाला.विद्यार्थ्यांशी दररोज भेट होत असल्यामुळे दररोज ज्ञान दानाचे महान कार्य करण्याचे महान कार्य आमच्या हातून घडतय व समाजातील गरीब अशिक्षित पालकांच्या पाल्याना आम्ही काही देऊ शकू या पेक्षा वेगळा आनंद अशुच शकत नाही.
ही सर्व तरुण दिवसभर मिळेल ती कामे करून तसेच शेतीच्या मशागतीची कामे सांभाळून रात्री वेळात वेळ काढून दररोज ही शिकवणी चालू आहे या उपक्रमाचे पाड्यावरील नागरिकांबरोबरच परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.