शिक्षकांना विम्याचे कवच देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:30+5:302021-05-05T04:58:30+5:30
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोविड संदर्भात कर्तव्य पार पाडत असल्यामुळे शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच, सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबत ...

शिक्षकांना विम्याचे कवच देण्यात यावे
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोविड संदर्भात कर्तव्य पार पाडत असल्यामुळे शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच, सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने शासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे शिक्षण संचालनालय (प्राथ.) यांच्यामार्फत पाठविण्याचे शासनातर्फे कळविण्यात आले.
असे असतानाही राज्यातील अनेक शिक्षकांचा कोविडचे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेला असतानाही अनेक जिल्ह्यांमधून संबंधित शिक्षकांचे परिपूर्ण प्रस्ताव अद्यापही प्राथमिक शिक्षक संचलनालयातर्फे शासनाला पाठविण्यात आलेले नाहीत. नागपूर जिल्ह्यातून दोन प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र ते परिपूर्ण नसल्याने, परत आले आहेत. हे प्रस्ताव पाठविण्यांसदर्भात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येते. त्यामुळे कोविडचे कर्तव्य बजावत असतांना कोरोनामुळे मृत्यू हेाणाऱ्या शिक्षकांना विम्याचे कवच, सानुग्रह साहाय्य मिळण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याची कार्यवाही करण्याबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.