रोटरी क्लब शिंदखेडातर्फे शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:56+5:302021-09-06T04:39:56+5:30
अध्यक्षीय मनोगतात जगदीश पाटील यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच तीनही सत्कारार्थी शिक्षक कृतिशील असल्याने सत्कारासाठी त्यांची केलेली ...

रोटरी क्लब शिंदखेडातर्फे शिक्षकांचा गौरव
अध्यक्षीय मनोगतात जगदीश पाटील यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच तीनही सत्कारार्थी शिक्षक कृतिशील असल्याने सत्कारासाठी त्यांची केलेली निवड सार्थ असल्याचे सांगितले.
सत्करार्थी शिक्षक गणेश नागरगोजे यांनी मनोगतात त्यांच्या यशस्वी शिक्षकी कारकिर्दीच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या शिक्षकांचाच मोलाचा वाटा असल्याचे सांगितले, तर विशाल कोळी यांनी जुने आच्छी येथील गावकऱ्यांच्या सहभागामुळे शाळेची भरभराट शक्य झाल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे आणि क्लबचे अध्यक्ष गोपाल सिंग परमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन संदीप गिरासे यांनी केले तर प्रास्ताविक हर्षल अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण बोरसे, देवेंद्र नाईक, हितेंद्र जैन यांनी प्रयत्न केले. यावेळी जुने आच्छी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चुनिलाल भास्कर ईशी, उपाध्यक्ष नामदेव बुधा कोळी, उपसरपंच
शांताराम कोळी, माजी सरपंच संभाजी कोळी, छोटुलाल ईशी, प्रमोद पटेल, रवींद्र कोळी, प्रवीण कोळी, रोहित ईशी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आभार विशाल कोळी यांनी मानले.