शिरपूर तालुक्यात शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:41+5:302021-09-06T04:39:41+5:30
दहिवद येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रकाश व्यास यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला़. पहिली ते ...

शिरपूर तालुक्यात शिक्षक दिन साजरा
दहिवद येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रकाश व्यास यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला़. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन सहभाग नोंदवला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त करून डॉ़. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर यांनी संस्थेतील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सचिव डॉ. धीरज बाविस्कर यांनी शिक्षकांचे कौतुक केले़.
डॉ. रंधे स्कूल शिरपूर
शिरपूर शहरातील डॉ. विजयराव व्ही़. रंधे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे कामिनी पाटील यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समन्वयक प्रा. जी. व्ही. पाटील, प्राचार्य सारिका ततार, प्रमोद पाटील उपस्थित होते. चौथीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले, तर दहावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी प्रत्यक्ष अध्यापन केले. जयेश विसपुते व लिझा मन्सुरी या विद्यार्थ्यांनी प्राचार्यपदाचा अनुभव सांगितला. याप्रसंगी वंदना पांडे, समाधान राजपूत, मनीषा पाटील, विशाल सोनगडे, वंदना पटकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदपुरी गोसावी यांनी केले. आभार विशाल पाटील यांनी मानले.
रणधीर स्कूल शिरपूर
शिरपूर शहरातील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. गुरू-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत अध्यपन केले. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. यात विद्यार्थ्यांची भाषणे, डान्स, ड्रामा व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत: हाताने बुके व ग्रीटिंग कार्ड बनवून शिक्षकांना भेट देऊन सन्मानित केले. शिक्षकाची भूमिका पार पाडलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.