शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डांगुर्णे येथील तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:25+5:302021-02-24T04:37:25+5:30
सोडले येथील सुलवाडे - जामफळ - कनोली सिंचन प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतजमिनीतील गटाच्या ७/१२ वर पीकपेरणी फळबाग लागवडीची बनावट ...

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डांगुर्णे येथील तलाठी निलंबित
सोडले येथील सुलवाडे - जामफळ - कनोली सिंचन प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतजमिनीतील गटाच्या ७/१२ वर पीकपेरणी फळबाग लागवडीची बनावट पीकपाहणी नोंदी घेतल्या. शेतजमिनीतील संयुक्त मोजणी पत्रकात व मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेची तक्रार करण्यात आली होती. यावरून सोडले गावाचे तलाठी किशोर नेरकर यांच्या दप्तरांची तपासणी तहसीलदार सौंदणे केली असता मागील वर्षाचे जिरायती शेतीवर बागायतीची नोंद करून डाळिंब, आंबे व इतर फळांच्या लागवडीच्या नोंदी ७/१२ वर घेतल्याचे दिसून आले आहे. २०१६-१७ व २०१७-१८या वर्षांचे अवलोकन केले असता या गटात खरीप पिकांचे उत्पादन घेतल्याचे दिसून आले. नेरकर याने १८५ शेतकऱ्यांच्या जिरायत जमिनी फळबागा दाखवून शासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी तलाठी नेरकर यास नोटीस बजावली होती. तसेच त्यासंदर्भातील अहवाल प्रांताधिकारी विक्रांत बादल यांना पाठविला होता. प्रांताधिकाऱ्यांनी तलाठी नेरकर यास निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आदेशाशिवाय शिंदखेडा मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत.