स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:32 IST2019-11-18T11:31:36+5:302019-11-18T11:32:14+5:30
आयुक्त अजिज शेख : महापालिकेत नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले दिशानिर्देश

dhule
धुळे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना ओडीएफ दर्जा व कचरामुक्त शहर तारांकित मानांकनात थ्रीस्टार मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ते पूर्ण करून स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवा, असे निर्देशआयुक्त अजिज शेख यांनी दिले़
स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत मानांकन मिळविण्याबाबत महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली़ याप्रसंगी आयुक्त अजीज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती निशा पाटील, विरोधी पक्षनेती साबीर शेख, उपायुक्त गणेश गिरी, नगरसेवक नागसेन बोरसे, भिकन वराडे, राजेश पाटील, रावसाहेब नांद्रे उपस्थित होते.
बैठकीत सहाय्यक आयुक्त विजय सनेर यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाºया उपक्रमाची माहिती देवुन स्पर्धेच्या नियोजनाबाबत विवेचण केले. तर सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी कचरामुक्त शहरासाठी अमंलबजावणी व त्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांमार्फत करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती विशद केली. प्रत्येक प्रभागात नियुक्त केलेल्या कर्मचाºयांनी कार्यालयीन कामाच्या वेळे व्यतिरिक्त अन्य वेळेत आपन राहत असलेल्या प्रभागातील घरस्तरावर भेटी देवुन ओल्या कचºयावर पुर्नप्रक्रीया करण्याबाबत प्रोत्साहीत करावे व घंटागाडीत कचरा वर्गीकरण करण्याबाबत माहिती द्यावी असेही आयुक्त शेख यांनी सांगितले़