अर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई कराः धुळे जिल्हा काॅँग्रेस अध्यक्ष शाम सनेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:43+5:302021-01-23T04:36:43+5:30
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी अर्णब ...

अर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई कराः धुळे जिल्हा काॅँग्रेस अध्यक्ष शाम सनेर
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी अर्णब गोस्वामी यांना माहिती मिळाली होती. याबाबत गोस्वामी यांना कशी माहिती मिळाली. याबाबत सर्व सखोल चौकशी करून गोस्वामी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, जिल्हा सरचिटणीस डॉ दरबारसिंग गिरासे, शिरपूर तालुकाध्यक्ष मनोहर पाटील,किसान सेलचे शाम भामरे, नरेंद्र पाटील,बापू खैरनार, शामकांत पाटील,पंढरीनाथ पाटील, बाजीराव पाटील,भिवसन अहिरे, रावसाहेब पाटील, राजेंद्र भदाणे, भानुदास माळी,भगवान गर्द, जाविद हुसनौद्दीन, किरण नगराळे, हरिभाऊ चौधरी, मुकेश खरात, हर्षल साळुंखे, रावसाहेब पवार, ज्ञानेश्वर मराठे, राजेंद्र खैरनार आदींनी केली आहे.