अंत्यविधीची जबाबदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:48 IST2020-05-27T21:47:28+5:302020-05-27T21:48:01+5:30

चंद्रशेखर आझाद नगर : प्रशासनाला दिले निवेदन

Take responsibility for the funeral | अंत्यविधीची जबाबदारी घ्यावी

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यविधी करण्यासह मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी चंदशेखर आझाद नगर युवक शिवजयंती उत्सव समितीने केली आहे़
समितीचे पदाधिकारी डॉ़ योगेश पाटील, संजय शर्मा, प्रनिल मंडलीक, प्रदीप पाटील, विकास गोमसाळे, पंकज धात्रक, प्रवीण मोरे, शुभम चौधरी, आनंद सोनार आदींनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाबांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ मृतांचा आकडाही मोठा आहे़ कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यविधी करताना नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ मुळात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी शासन, प्रशासनाची असते़ परंतु धुळे जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही़
प्रशासन या कामात कमी पडत असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे आणि मदतीचे आवाहन करावे़ सेवाभाव आणि माणुसकी धर्म जपणाºया अनेक संघटना आणि अनेक दानशूर नागरिक जिल्ह्यात आहेत़ प्रशासन जबाबदारी घेणार नसेल तर चंद्रशेखर आझाद नगर युवक शिवजयंती उत्सव समिती या सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी जबाबदारी घेतील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे़ तसेच निवेदनात पदाधिकाऱ्यांच्या नावांपुढे त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक दिले असून संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
कोरोनाबाधितांचे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे़ तसेच कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या धर्माचा उल्लेख टाळण्याची विनंती केली आहे़

Web Title: Take responsibility for the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे