नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:27+5:302021-03-13T05:05:27+5:30
शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता त्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत झालेली कार्यवाही व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात शुक्रवारी ...

नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता त्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत झालेली कार्यवाही व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात शुक्रवारी महापाैर चंद्रकांत सोनार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल उपस्थित होते.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यादृष्टीने मनपा मार्फत आवश्यक ती सुसज्जता असावी व नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापाैर सोनार यांनी दिल्यात. बैठकीत प्रामुख्याने रुग्णांच्या विलगीकरणासाठी कोविड सेंटर कार्यान्वित करणे, शासकीय तंत्रनिकेतन, सिव्हिल हॉस्पिटल येथे अतिगंभीर रुग्णांसाठी अजमेरा कॉलेज येथे आवश्यक सुविधा, तसेच भोजन व्यवस्थासह कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे, तसेच शहराच्या विविध भागात रॅपिड टेस्ट करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, आग्रारोड व रहदारीच्या ठिकाणी फिरते रॅपिड टेस्ट केंद्र कार्यान्वित करणे तसेच सोमवारपासून शहराच्या विविध भागात आराखडा तयार करून रसायन फवारणी करणे, नागरिकांसाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविणे, कन्टेनमेंट झोन निर्मिती तसेच सदर झोनमधील नागरिकांची दैनंदिन तपासणी करणे, विना मॉक्स व नियम भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
या बैठकीस उप-महापौर कल्याणी अंपळकर, सभापती संजय जाधव, अतिआयुक्त गणेश गिरी, वंदना थोरात, सावीरशेठ, नागसेन बोरसे, राजेश पवार, युवराज पाटील, दगडू बागुल, उपायुक्त शिल्पा नाईक, सहा. आयुक्त विनायक कोते, मनोज वाघ, महेंद्र परदेशी, महेंद्र सोनवणे, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील व अन्य खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.