बिबट्याचा बंदोबस्त करा, पिंजरा, ट्रॅक्युलेशन गण। लस उपब्लध करून द्या - भारतीय किसान काँग्रेसने प्रधान मुख्य वनसंरक्षकाला पत्र लिहून केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:03+5:302021-07-25T04:30:03+5:30
असे पत्र नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना लिहून भारतीय किसान काँग्रेसने मागणी केली आहे. साक्री तालुक्यातील काटवान भागात छाईल, ...

बिबट्याचा बंदोबस्त करा, पिंजरा, ट्रॅक्युलेशन गण। लस उपब्लध करून द्या - भारतीय किसान काँग्रेसने प्रधान मुख्य वनसंरक्षकाला पत्र लिहून केली मागणी
असे पत्र नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना लिहून भारतीय किसान काँग्रेसने मागणी केली आहे.
साक्री तालुक्यातील काटवान भागात छाईल, मालपूर, कासारे, धमणार, बेहेड, काळगाव, विटाई, दिघावे, प्रतापपूर, निळगव्हाण, नाङसे, उंभर्टी, देगाव व पश्चिम पट्ट्यात लोक शेतीवर अवलंबून असून, या भागातील लोक सध्या कोविड -१९ कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला म्हणून गावात न राहता शेतात राहण्यासाठी गेले; परंतु या भागात बिबट्याचा खुला संचार आहे. त्यामुळे शेतकरी लोक घाबरले आहेत. या गावांमध्ये बिबट्याद्वारे शेळ्या, गाई, म्हैशी फस्त करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे परिसरात शेतीचे काम करण्यासाठी मजूरसुद्धा येत नाही, अशी परिस्थिती आहे. तरी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था करून देण्यात यावी. तसेच वन कर्मचाऱ्यांना ट्रॅक्युलेशन गणदेखील उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच बिबट्याने हल्ला केल्यानंतर लागणारी लस प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी भारतीय किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष कपिल जाधव यांच्यासह सचिन सोनवणे, प्रशांत देसले, आकाश काकुस्ते, दिनेश बोरसे, दीपक साळुंके यांनी एका पत्राद्वारे केली आहे.