कापूस पिकाची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:49+5:302021-09-02T05:17:49+5:30
न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा ...

कापूस पिकाची काळजी घ्यावी
न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा दिली असली तरी पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीस अन्नद्रव्ये न मिळाल्याने कापूस फुटण्यापूर्वीच कापूस पीक लाल पडत आहे .अनियमित पावसात कापूस पिकाची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन नाशिकचे विभागीय जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनील वानखेडे यांनी केले. जापी परिसरात त्यांनी पीक पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी एक गाव एक वाण ही संकल्पना राबवावी . गुलाबी बोन्ड अळी व्यवस्थापन करून कीड नियंत्रण करणे . यासाठी कामगंध सापळे वापरावे . कापूस वेचणी चालू झाली तरी गरजेनुसार खतांची मात्रा व फवारणी करावी , असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले . यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे . पिकांना खते दिली त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने उष्णता वाढली . त्यातच कडक ऊन यामुळे पाऊस लाल पडून पिक जळत आहे कृषी विभाग कंडे या बाबत तक्रारी होत असल्या कारणाने विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे , उपविभागीय कृषी अधिकारी मालपुरे , तालुका कृषि अधिकारी वाल्मिक प्रकाश , मंडळ कृषि अधिकारी मनीषा पाटील , कृषि पर्यवेक्षक एस पी देवरे कृषि सहाय्यक राकेश परदेशी व मनोज वानखेड़े यांनी क्षेत्रीय भेट न्याहळोद परिसरातील जापी येथे भेट दिली .
मोठ्या खंडानंतर पाऊस आल्यावर पिकात मर रोग येतो , हिरवी पाने पिवळी लाल होतात , बोनडे किंवा फुल पाते गळून पडतात . यास ग्रामीण भागात लाल्या म्हणतात . यासाठी पाण्याचा निचरा करावा , कॉपर ऑक्सिक्लोराईड व युरिया यांचे द्रावण झाडांच्या मुळापर्यंत जाईल असे टाकावे असे उपाययोजना सांगितल्या आहेत .
010921\img-20210827-wa0036.jpg
पीक पाहणी वमार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त ...…
जापी शेतशिवर