Take action on those who upload offensive posts | आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करा

Dhule

धुळे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड येथील विश्वंभर चिखलीकर यांनी फेसबुकवर हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केली. त्यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेचा समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. विश्वंभर चिखीलकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुदाम राठोड, सचिव चत्रू पवार यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

Web Title: Take action on those who upload offensive posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.