भावना दुखाणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:46 IST2020-06-18T21:45:55+5:302020-06-18T21:46:14+5:30
जमीअत उलमा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

dhule
धुळे : धार्मिक भावना दुखावणाºया एका वृत्त वाहिनीवर आणि वृत्त निवेदकावर कारवाई करण्याची मागणी जमीअत उलमा संघटनेने केली आहे़
जमीअत उलमाचे जिल्हाध्यक्ष हाफिज हिफजुर रहेमान, शहराध्यक्ष मौलाना जियाउर रहेमान, उपाध्यक्ष मौलाना शकील कासमी, सचिव मुश्ताक सुफी, मौलाना आबीद कासमी, मुफ्ती शफीक कासमी, महमंद युसूफ, माजी महापौर शव्वाल अन्सारी, परवेज अहमद, मुख्तार शरीफ, महंमद आरीफ, एजाज अहमद आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, प्राचिन काळापासून आपल्या देशात सूफी, संत, साधू, महापुरूषांनी एकता, अखंडता, सद्भावना, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला आहे़ सूफी हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे देखील त्यातीलच एक आहेत़ ते केवळ एका समुहापुरते मर्यादीत नसून सर्व जातीधर्माचे श्रध्दास्थान आहेत़ सर्वजण अजमेरला जावून दर्शन घेतात़ दरवर्षी उर्समध्ये देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री जनकल्याणासाठी चादर अर्पण करुन प्रार्थना करतात़
परंतु एका खाजगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात एका वृत्तनिवेदकाने सूफी हजरत ख्वाजा मोईनुद्दीन यांच्याबद्दल अपशब्ध वापरुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत़ जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे या घटनेचा जमीअत उलमाने तीव्र शब्दात निषेध केला आहे़ तसेच संबंधित वृत्तवाहिनी आणि वृत्तनिवेदकार कायदेशिर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
तसेच लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने कामगार, कष्टकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे़ ते कर्जबाजारी आहेत़ त्यांना लॉकडाऊन काळातील विज बील माफ करण्याची मागणीही त्यांनी केली़