धुळे : फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात तपास यंत्रणा पक्षपातीपणा करीत असून संशयित कपील मिश्राला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे़ याच्या निषेधार्थ अल्पसंख्यांक नागरी हक्क संघर्ष समितीने दिल्ली पोलिसांना बांगड्यांचा आहेर दिला आहे़ हिंसाचाराच्या खोट्या गुन्ह्यात अटक केलेल्या गर्भवती महिलेची सुटका करावी, निवृत्त न्यायमूर्तींमार्फत हिंसाचाराची चौकशी करावी, अशी मागणी गफ्फार अन्सारी, अॅड़ जुबेर शेख, मुनाफ शेख, दावूद मन्सुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देवून केली आहे़
दिल्ली हिंसाचारातील दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:49 IST