बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करा-जिल्हाधिकारी संजय यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:56+5:302021-02-05T08:45:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी ...

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करा-जिल्हाधिकारी संजय यादव
जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आयुक्त अजिज शेख, पोलीस उपअधीक्षक प्रदीप पाडवी, हिरे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. महेश मोरे, विजय बच्छाव, डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲङ चंद्रकांत येशीराव आदी उपस्थित होते. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुध्द तातडीने कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलीस दलाची मदत घ्यावी. तसेच संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करावेत. यापूर्वी गुन्हा दाखल होऊनही पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कठोर कारवाई करावी. याशिवाय अशा वैद्यकीय व्यावसायिकांची यादी प्रकाशित करावी. महानगरपालिकेनेही आपल्या कार्यक्षेत्रातील अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी. नागरिकांनी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधातील तक्रार नोंदवावी. तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाईस टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले.