नवसाला पावणारा स्वयंभू गणपती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:24+5:302021-09-15T04:41:24+5:30

मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची व शेंदूरजडीत आहे. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. गणेश मूर्तीला ...

Swayambhu Ganpati who gets Navsa! | नवसाला पावणारा स्वयंभू गणपती !

नवसाला पावणारा स्वयंभू गणपती !

मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची व शेंदूरजडीत आहे. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. गणेश मूर्तीला चार हात असून, एक हात आशीर्वाद देताना आहे. दुसरा हात हा मांडीवर असून, उर्वरित दोन हातात शस्त्र आहेत. गणेश मूर्ती ही पश्चिम मुखी असून, मंदिराचा आतील भाग हा संगमरवरी या पाषाणाचा वापर करून उत्कृष्ट असा गाभारा उभारण्यात आलेला आहे. मंदिरात भव्य सभामंडप आहे. मंदिरातील नित्यसेवेची पूजा म्हणून अंबादास गवळी हे पुजारी म्हणून काम पाहात आहेत. गणेश उत्सवात मंदिरावर रोषणाई करण्यात येते. चतुर्थीच्या दिवशी मंदिरात दाम्पत्यांच्या हस्ते आरती केली जाते. मंदिरात दररोज सायंकाळी तरुणांद्वारे आरती होते. परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

Web Title: Swayambhu Ganpati who gets Navsa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.