वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित

By Admin | Updated: January 21, 2017 00:35 IST2017-01-21T00:35:05+5:302017-01-21T00:35:05+5:30

अन्य तिघा कर्मचा:यांनाही निलंबनाची टोपी

Suspended police constables suspended by the superiors | वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित

वरिष्ठांशी वाद घालणारा पोलीस हवालदार निलंबित



धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) सहायक पोलीस निरीक्षकाशी वाद घालणा:या हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच असभ्य वर्तनासह विविध कारणांवरून दहा दिवसात जिल्ह्यातील आणखी तीन पोलीस कर्मचा:यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली            आह़े त्यात देवपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बी़ डी़ साळुंखे, निजामपूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विलास बुधा बोरसे, सोनगीर येथील कॉन्स्टेबल युवराज रमण पाटील यांचा समावेश आहे.   तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.

प्रचंड गंभीर तक्रारी
अधिका:याशी उद्धटपणाचे वर्तन, महिलेशी ईल वर्तन, आदेश दिल्यानंतरही अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई न करणे आणि  इतर कर्मचा:यांनी कारवाई केल्यास त्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या.

Web Title: Suspended police constables suspended by the superiors