वर्दीचा माज असलेल्या एपीआय नागवे यांना निलंबित करा - कुणाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:41 PM2022-12-09T18:41:24+5:302022-12-09T18:42:01+5:30

वर्दीचा गैरवापर करणाऱ्या जालनाच्या एपीआय शिवाजी नागवे यांना पोलीस खात्यातून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे.

Suspend uniformed API Nagve - Kunal Patil, MLA | वर्दीचा माज असलेल्या एपीआय नागवे यांना निलंबित करा - कुणाल पाटील 

वर्दीचा माज असलेल्या एपीआय नागवे यांना निलंबित करा - कुणाल पाटील 

Next

धुळे : धुळे शहरातील जेल रोड येथे सकल धनगर समाजतर्फे जालना जिल्ह्यातील हदगाव येथील एपीआय शिवाजी नागवे यांनी धनगर समाज बांधवांवर अमानुष अत्याचार करून शिराळ भाषेत शिविगाळ केली प्रकरणी निलंबित करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील देखील सहभागी झाले होते. 

वर्दीचा गैरवापर करणाऱ्या जालनाच्या एपीआय शिवाजी नागवे यांना पोलीस खात्यातून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. धुळ्यातही आज धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर समाज बांधवांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी आंदोलनकत्यांनी केली. 

धुळे शहरातील क्युमाईन क्लब परिसरात हे आंदोलन पुकारण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जालनाच्या परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथील धनगर बांधवाच्या घरावर गावातील काही लोकांनी सामुहिक हल्ला करुन दगडफेक केली होती. याबाबतची तक्रार देण्यासाठी गेलेल्या अन्यायग्रस्त लोकांची फिर्याद दाखल करुन न घेता उलट त्यांनाच पोलीस कोठडीत डांबून मारहाण करण्यात आली. 

आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी नागवे हे फिर्यादी नागरिकांना मारहाण करीत शिवीगाळ करीत आहेत. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरत असल्याचे व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमधून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप धनगर समाज बांधवांनी या आंदोलना दरम्यान केला. 

धनगर समाज बांधवांनी पुकारलेल्या या आंदोलनाला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देखील हजेरी लावली त्यांनी संबंधित प्रकरण समजावून घेत हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे मी राज्य सरकार आणि गृह मंत्र्यांना विनंती करतो की संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर बडतर्फची कारवाई झाली नाही तर येनारच्या विधानसभेच्या अधिवेशनात धनगर समाज बांधवांवर झालेल्या अत्याचारा करणाऱ्या एपीआय शिवाजी नागवेच्या विरोधात आंदोलन करून अधिवेशन बंद पाडू असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Suspend uniformed API Nagve - Kunal Patil, MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.