साक्री येथील कोरोना पॉझिटिव्ह खुनाचा संशयित आरोपी रुग्णालयातून फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 14:09 IST2020-06-13T14:08:55+5:302020-06-13T14:09:38+5:30
हिरे वैद्यकीय महाविद्यालय : शोध सुरु

साक्री येथील कोरोना पॉझिटिव्ह खुनाचा संशयित आरोपी रुग्णालयातून फरार
धुळे : साक्री येथील कोरोना पॉझिटिव्ह खुनाचा संशयित आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे़ आरोपी फरार झाल्याच्या वृत्ताला अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी दुजोरा दिला आहे़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याचेही त्यांनी सांगितले़ दरम्यान, फरार झालेल्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत़