माेहाडी सरपंचपदी सुषमा सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:31+5:302021-02-17T04:42:31+5:30
आमदार कुणाल पाटील समर्थक जवाहर विकास पॅनलने ११ पैकी १० जागांवर विजय मिळविला होता. ...

माेहाडी सरपंचपदी सुषमा सूर्यवंशी
आमदार कुणाल पाटील समर्थक जवाहर विकास पॅनलने ११ पैकी १० जागांवर विजय मिळविला होता. यावेळी नवनिर्वाचित सदस्य संजय देवाजी पाटील, रेखा मोरे, मंगलबाई पाटील, महेश चौधरी, लताबाई भिल, विलास भिल, वैजयंताबाई भिल, राधाबाई पाटील, हिंमत पाटील उपस्थित होते.
पीठासीन अधिकारी नेमाने, तलाठी गोपाल चंदेल, ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
८० वर्षात फक्त दुसऱ्यांदाच महिला सरपंच
-मोहाडी ग्रामपंचायतची स्थापना १९४१ साली झाली. यापूर्वी १९९५ मध्ये कमलबाई सोमनाथ चौधरी यांना पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान मिळवला होता. तर तब्बल २५ वर्षांनंतर दुसऱ्या महिला सरपंच सुषमा योगेश सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, मधुकर खैरनार ,जि. प. सदस्य अरविंद जाधव, किसान युवा क्रांतीचे राज्य अध्यक्ष यशवंत गोसावी, आदींनी स्वागत केले आहे.