धुळ्याच्या माहेरवाशिणीचा सुरतला पैशांसाठी छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:32+5:302021-06-10T04:24:32+5:30
धुळे : येथील जुने धुळे भागातील वरखेडी रोडवर माहेर असलेल्या धनश्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी (२२) या विवाहितेचा सुरत येथे सासरी ...

धुळ्याच्या माहेरवाशिणीचा सुरतला पैशांसाठी छळ
धुळे : येथील जुने धुळे भागातील वरखेडी रोडवर माहेर असलेल्या धनश्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी (२२) या विवाहितेचा सुरत येथे सासरी छळ केल्याप्रकरणी पतीसह ९ जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धनश्रीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर महिनाभर चांगली वागणूक दिली. परंतु ११ मे २०२१ पासून ते आजपर्यंत पैशांची मागणी करुन छळ करण्यात आला. या फिर्यादीवरुन पती ज्ञानेश्वर भगवान सूर्यवंशी (रा. बगुमरा, ता. पलसाना, जि. सुरत), भगवान गंगाराम सूर्यवंशी, आशाबाई भगवान सूर्यवंशी दोघे रा. गाळदे ता. धरणगाव जि. जळगाव, जिजाबाई हिरामण पाटील रा. हातनूर ता. शिंदखेडा, सुनंदाबाई नारायण सूर्यवंशी, नारायण भगवान सूर्यवंशी, जतीन नारायण सूर्यवंशी तिघे रा. सुरत यांच्याविरुध्द मंगळवारी दुपारी आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक साळवे करीत आहेत.