राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुरजची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:31 IST2018-11-25T21:30:52+5:302018-11-25T21:31:42+5:30

शिरपूर : राज्यस्तरीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

Suraj's selection in the national boxing tournament | राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुरजची निवड

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुरजची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी.पटेल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सुरज हिरामण शिरसाठ या विद्यार्थ्याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याची स्पर्धेसाठी निवड झाली आहे़
मुंबई येथील स्पर्धेत लातूर, औरंगाबाद, अमरावती विभागातील खेळाडूंना नमवत सुरज शिरसाठ याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यांनी निवड  गुवाहाटी येथे होणाºया राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेकरीता होवून तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा  जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील यांनी कौतुक केले. याकामी धुळे जिल्हा बॉक्सिग असोसिएशनचे सचिव मयूर बोरसे, भरत कोळी, क्रीडाशिक्षक आर.यू.चौधरी, के.पी.दोरीक यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.

Web Title: Suraj's selection in the national boxing tournament

टॅग्स :Dhuleधुळे