महापालिका भ्रष्टाचारात तथाकथित भैय्याचे अधिकाऱ्यांना पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:40+5:302021-07-04T04:24:40+5:30
मनपाचे ओव्हरसीयर सी.सी.बागुलांची मनोज माेरे यांनी माहितीच्या अधिकारात मनपाच्या कामांची नोंद असलेली एमबी मागितली होती. मात्र ओव्हरसीयर सी.सी.बागुल यांनी ...

महापालिका भ्रष्टाचारात तथाकथित भैय्याचे अधिकाऱ्यांना पाठबळ
मनपाचे ओव्हरसीयर सी.सी.बागुलांची मनोज माेरे यांनी माहितीच्या अधिकारात मनपाच्या कामांची नोंद असलेली एमबी मागितली होती. मात्र ओव्हरसीयर सी.सी.बागुल यांनी एम.बी.न दिल्याने माेरे यांनी ओव्हरसीयर बागुल यांची समक्ष भेट घेऊन एम.बी.ची विचारणा केली. यावेळी बागुल यांनी ठेकेदार एम.बी.घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसात पुन्हा भेट घेऊन विचारणा केल्यावर बागुल यांनी आयुक्त अजिज शेख यांच्या दालनात ठेकेदारावर कार्यवाहीसाठी पत्र ठेवल्याचे असल्याचे सांगितले. त्यांनतरही कारवाई न झाल्याने माेरे यांनी आयुक्त शेख यांची भेट घेतल्यावर बागुल यांनी कोणतेही पत्र आयुक्तांकडे न दिल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी बागुल यांनी संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलिसात करण्याचे आदेश बागुल यांनी दिल्यावर देखील बागुल यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत ठेकेदाराचे नाव न टाकता निनावी पत्र पोलिसात दाखल केल आहे. आजपर्यंत संबंधित ठेकेदारावर काेणतीही कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचारात अधिकारी, सत्ताधारी तसेच ठेकेदार सहभागी असल्याचे आरोपही माेरे यांनी केला आहे.