विष्णु भागवत प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:52 IST2021-01-19T22:52:19+5:302021-01-19T22:52:39+5:30
आर्थिक गुन्हे शाखा

विष्णु भागवत प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल
धुळे : माऊली मल्टिस्टेट क्रेडीट को-आॅपरेटीव्ह सोसायटी स्थापन करुन त्यात ठेवीदारांना आकर्षक व्याजदाराचे आमिष दाखविणारा संशयित विषु भागवत याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात १ हजार ३६५ पानांचे पुरवणी आरोपपत्र सोमवारी धुळे न्यायालयात दाखल करण्यात आले. १ हजार ४६१ ठेवीदारांचे आर्थिक शोषण करुन १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची फसवणूक याप्रकरणात झाली आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्यात मुख्य संशयित विष्णू रामचंद्र भागवत याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्याच्याविरोधात विहित मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर याप्रकरणातील सह आरोपी भैय्यासाहेब यशवंत गुजेला याला अटक करण्यात आली. पुराव्यांची जमवा-जमव करुन सोमवारी १ हजार ३६५ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तपास करीत आहेत़