रविवारी ८८ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:41 PM2020-08-09T21:41:18+5:302020-08-09T21:42:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील ८८ रूग्णांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला. ...

Sunday 88 reports positive, two patients die | रविवारी ८८ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील ८८ रूग्णांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चितोड रोड परिसरातील ५९ व जुने धुळे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रविवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ५२ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिंदखेडा तालुक्यातील सात, धुळे तालुक्यातील १०, शिरपूर तालुक्यातील दोन, व साक्री तालुक्यातील १७ रूग्णांना बाधा झाली आहे़ जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ४३०५ इतकी झाली आहे.

Web Title: Sunday 88 reports positive, two patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.