रविवारी ८६ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 20:44 IST2020-09-20T20:44:32+5:302020-09-20T20:44:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ८६ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला़ मृतांमध्ये धुळे ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी ८६ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला़
मृतांमध्ये धुळे तालुक्यातील मेहेरगाव व शिरपूर येथील एका रूग्णाचा समावेश आहे़
रविवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ४१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ५९१ इतकी झाली आहे. तर ३४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़