रविवारी तब्बल चौदा जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:44 IST2020-05-31T17:40:17+5:302020-05-31T17:44:05+5:30
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून निरोप

dhule
धुळे : जिल्ह्यातील तब्बल १४ रूग्णांनी एकाच दिवशी कोरोनावर मात केली आहे. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून रविवारी १४ रूग्णांना निरोप देण्यात आला. तीन रूग्ण २० मे रोजी तर ११ रूग्ण २२ मे रोजी रूग्णालयात दाखल झाले होते. कोरोनावर मात केलेल्या रूग्णामध्ये जिल्हा कारागृहातील तीन व्यक्ती, वाडीशेवाळे येथील २९ व ३६ वर्षीय तरूण, शिरूड येथील ३९ वर्षीय पुरूष , बल्हाणे येथील ३६ वर्षीय पुरूष व ३४ वर्षीय महिला, कोरके नगर धुळे येथील ३३ वर्षीय पुरूष, हाटकरवाडी चितोड रोड येथील ४७ वर्षीय महिला, चक्करबर्डी पाईप कारखाना येथील ४७ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरूष व २२ वर्षीय तरूण, पत्रकार कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे़