तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: July 28, 2014 13:37 IST2014-07-27T23:57:53+5:302014-07-28T13:37:24+5:30

राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली.

Suicides of three farmers | तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

जळगाव/बीड : राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली.
बाणगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी रमेश जगन्नाथ शेलार (५०) यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी दुपारी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक व सावकाराचे कर्ज होते, असे समजते. तर आडगाव (ता. एरंडोल) येथील शेतकरी सुभाष संतोष पाटील (३२) यांचा मृतदेह रविवारी सकाळी शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही.
बीड तालुक्यातील मैंदा येथील अर्जुन सुदाम खांडे (२७) या तरुण शेतकर्‍याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. बीड तालुक्यातीलच पेंडगाव येथील भारत गणपत धट (५५) यांनी शुक्रवारी मध्यरात्री आत्महत्या केली होती.
टोळीसाठी कारखान्याचा करार न झाल्याच्या नैराश्यापोटी अर्जुन यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicides of three farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.