वेगवेगळ्या घटनेत तिघांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:04 IST2020-07-06T21:04:20+5:302020-07-06T21:04:50+5:30
धुळे जिल्हा : व्यक्त होतेय हळहळ

वेगवेगळ्या घटनेत तिघांच्या आत्महत्या
धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत़ त्यात धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्याचा समावेश आहे़ दरम्यान, आत्महत्या केलेल्या ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात आली़ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली़
मलांजन ता़ साक्री
साक्री तालुक्यातील मलांजन येथील संजय पंडित ठाकरे या ३५ वर्षीय युवकाने आजाराला कंटाळून गळफास घेतला़ घराच्या छताला ओढणी बांधून तो लटकलेला दिसून आला़ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले़ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल पाटील घटनेचा तपास करीत आहेत़
काळखेडा ता़ धुळे
धुळे तालुक्यातील काळखेडा येथील भटाबाई वामन सोनवणे या ६५ वर्षीय वृध्देने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला़ घटना लक्षात येताच तिला धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉ़ पावरा यांनी तपासून मयत घोषीत केले़
म्हळसर ता़ शिंदखेडा
शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथील नाण्या सुपा पावरा या ४० वर्षीय युवकाने दारुच्या नशेत गळफास घेतला़ गावातीलच नाल्यात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला़ मयत झालेला युवक हा बडवानी जिल्ह्यातील नेवाली तालुक्यातील हुल्यापाणी येथील मूळ रहिवाशी होता़